top of page
Dr. Amit Zapate

आयत्या बिळावर रेघोट्या ओढणाऱ्या विषारी सापापासून सावधान असावे, अन्यथा.....

आयत्या बिळावर रेघोट्या ओढणाऱ्या विषारी सापापासून सावधान असावे, अन्यथा हे विषारी साप समाजाला डसल्याशिवाय राहणार नाही.


कोणताही समाज जुळत असतो तो नैतिक विचारावर आणि सत्यावर. सत्य ज्याच्या बाजूला असते त्याला कोणी हरवू शकत नाही, काही काळासाठी सत्याची बाजू झाकण्याचा प्रयत्न केला जाऊ शकतो परंतु सत्य कधीही प्ररास्थ होत नाही. सिनेट परिवर्तन पॅनल च्या बाबतीतही तेच झालेले आहे. सिनेट परिवर्तन पॅनल ची सुरुवात आणि त्याची निव 2015 पासूनच सुरू झाली होती. त्यानंतर रातुम नागपूर विद्यापीठातील स्नातकोत्तर विद्यार्थ्यांनी या चळवळीला गती दिली. त्यावेळी त्याचे नामकरण व्हायचे होते. या चळवळीची बांधणी करण्यासाठी त्यांनी विविध प्रयत्न करणे सुरू केले. सुरुवातीला विद्यार्थ्यांच्या संघटनांना एकत्र करण्याचा प्रयत्न केल्या गेला आणि त्यानंतर समाजातील इतर संघटनांना आपल्या सोबत जोडून काम करण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरू केले. विद्यापीठाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेच्या सहाय्याने या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रतिनिधी ची निवडणूक लढविली आणि त्यात यशस्वीपणे वाटचाल केली. त्यांचे यश हे आता बहरायला लागले होते. त्यानंतर लगेचच 2017 नंतर सिनेटच्या विद्यापीठीय निवडणुकीची तयारी जोर धरत होती. 2018 मध्ये होणाऱ्या या सिनेटच्या निवडणुकीची तयारी या विद्यार्थ्यांनी लढवायचे ठरवले होते ही निवडणूक मोठी असल्याने यामध्ये विद्यापीठात येणाऱ्या सहा जिल्ह्यांचा समावेश होता. त्यामध्ये गोंदिया, भंडारा वर्धा,नागपूर, गडचिरोली आणि चंद्रपूर हे होय. यामधील गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यांचे समावेश गोंडवाना विद्यापीठात केले गेले आणि त्यानंतर उरलेल्या चार जिल्ह्यांचा समावेश हा रातुम नागपूर विद्यापीठात करण्यात आला होता. रातुम नागपूर विद्यापीठाच्या सिनेटच्या निवडणुका लढविण्यास करिता या विद्यार्थ्यांना एका निश्चित संघटनेची आवश्यकता होती. म्हणून यांनी सिनेट परिवर्तन पॅनल नावाचे एक संघटन सुरू केले आणि त्यांच्या मार्फत समाजातील सर्व सामाजिक राजकीय संघटनांना एकत्र करण्याचा कसोशीने प्रयत्न केला आणि ते त्यात यशस्वीही झाले. त्यानंतर सिनेट परिवर्तन पॅनल च्या साह्याने त्यांनी विद्यापीठात दोन सिनेट सदस्य निवडूनही आणले. त्यांचे हे यश लोकांच्या नजरेस भरायला लागले,त्यांनी अत्यंत खडतर प्रवासाने आणि प्रयत्नाने प्राप्त केले होते अक्षरशः चारी जिल्ह्यांचा प्रवास करताना कुठल्याही भूकपाण्याची तमा न बाळगता त्यांनी प्रचार केला आणि यश संपादन केले. त्यांनी त्या वेळेला सिनेट परिवर्तन पॅनल नागपूर विद्यापीठातील सिनेटची निवडणूक कशी लढवली तशीच हे सिनेट परिवर्तन पॅनल नागपूर विभागातील पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढवेल या दिशेने पावले उचलायला सुरुवात केली आणि येथेच विषारी सापांची निर्मिती झाली. हे विषारी साप बाहेर पडायला लागले कारण त्यांना या पॅनेलमधून स्वतःच्या राजकीय स्वार्थाची बाजू दिसू लागली. या स्वार्थी सर्

लोकांनी सिनेट परिवर्तन पॅनल चे नाव फक्त परिवर्तन पॅनल असे केले. आणि या सिनेट परिवर्तन पॅनलचे स्लोगल खूप लढलो बेकिने,आता लढूया एकीने त्यात फक्त च चा वापर करून आपले स्वतःचे वेगळे दुकान सुरू केले. सिनेट परिवर्तन पॅनल महत्प्रयासाने मागील सहा वर्षापासून नागपूरमध्ये आपल्या राजकीय चळवळीची वाटचाल करीत असताना या पिसाळलेल्या सापांनी त्यांच्यावर घाव घालण्यास सुरुवात केली लोकांच्या भावनांना पायदळी तुडवत त्यांच्याशी संगनमत केले आणि त्यांना खोटेनाटे सांगून त्यांची दिशाभूल केली. समाजानेही काही सत्य पडताळून न पाहता भावनिकतेचा आधार घेत त्यांनाच खरे समजून त्यांची मदत केली. नागपूर विद्यापीठातील सुरू झालेली ही सिनेट परिवर्तन पॅनल ची चळवळ खर्‍या अर्थाने उच्चविद्याविभूषित पोरांची संघटना होती त्या वेळेला सिनेट परिवर्तन पॅनलचे जे उमेदवार होते ते आजही परिवर्तन पॅनलचे सोबतच आहे. तसेच त्यावेळच्या संघटनाही परिवर्तन पॅनल च्या सोबतच आहे. परंतु जे लोक समाजाची दिशाभूल करत आहेत त्या लोकांपासून सावधान करण्याकरिता आपणा सर्वांना प्रयत्न करावे लागतील. सिनेट परिवर्तन पॅनलचे नाव बदलून परिवर्तन पॅनल जरी केले किंवा स्लोगन मध्ये च लाऊन बदल केला तरीही त्यावेळी लढणाऱ्या त्या तरुण पोरांची ही सीनेट परिवर्तन पॅनल संघटना आहे, ती आजही कायम शाबूत आणि शाश्वत आहेत. त्यामुळे समाजातील सर्व घटकांना ही आग्रहाची विनंती आहे की त्यांनी सत्य जाणून घ्यावे आणि नागपूर विद्यापीठात सुरू झालेल्या या सिनेट परिवर्तन पॅनलच्या पाठीशी आपण उभे राहावे. सिनेट परिवर्तन पॅनल ने दिलेले आपले अधिकृत उमेदवार प्रा. प्रशांत भास्करराव डेकाटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे आणि त्यांनी लावलेले हे बोधीवृक्ष फुलवत न्यावे. सिनेट परिवर्तन पॅनलचा प्रवास अत्यंत खडतर आहे हे जरा समजून घ्या. त्यावेळीही त्यांनी स्वखर्चाने ती निवडणूक लढविली होती आणि आजही ते स्वखर्चाने ही निवडणूक लढवीत आहेत. समाजाची दिशाभूल करून त्यांनी कधीही समाजाकडून पैसा उकडलेला नाही आणि त्यांनी कोणाला फसवले ही नाही. या सिनेट परिवर्तन पॅनल च्या पाठीशी उभे राहणे आज अत्यंत गरजेचे आहे. कारण जर आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो नाही तर समाजात असे आठवले पुन्हा निर्माण होत राहतील असे विषारी साप निर्माण होतात आणि ते समाजाचे नुकसान करत राहील. चळवळी फोडणे हे त्यांचे काम आहे पण सत्याच्या बाजूने आपणाला खंबीरपणे उभे राहायचे आहे. सिनेट परिवर्तन पॅनल च्या या महान चळवळीचे आपण पाईक व्हावे. आयत्या बिळावर रेघोट्या ओढणार्यांना तुम्ही जाब विचारला पाहिजे आणि त्यांना धडा शिकविला पाहिजे म्हणून सर्व पदवीधरांना कळकळीची विनंती आहे की, त्यांनी सिनेट परिवर्तन पॅनलचे अधिकृत उमेदवार प्रा. प्रशांत भास्करराव डेकाटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे आणि आपण सिनेट परिवर्तन पॅनलच्या सोबतच राहावे ही आपणास कळकळीची आग्रहाची विनंती.


अमित झपाटे

नागपूर.

१३/११/२०२०

6 views

Comments


bottom of page