top of page
Writer's pictureSenate Parivartan Panel

नागपूर पदवीधर मतदार संघ करिता सिनेट परिवर्तन पॅनलचे प्रा. प्रशांत भास्करराव डेकाटे यांचा अर्ज

Updated: Nov 13, 2020

महाराष्ट्र राज्य विधान परिषद पदवीधर मतदार संघ नागपूर करिता सिनेट परिवर्तन पॅनलचे एकमेव अधिकृत उमेदवार प्रा. प्रशांत भास्करराव डेकाटे यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला.


 Close up of cookies
महाराष्ट्र राज्य विधान परिषद पदवीधर मतदार संघ नागपूर करिता सिनेट परिवर्तन पॅनलचे एकमेव अधिकृत उमेदवार प्रा. प्रशांत भास्करराव डेकाटे यांचा उमेदवारी अर्ज सादर करण्यात आला

महाराष्ट्र राज्य विधान परिषद नागपूर विभाग, पदवीधर मतदार संघ नागपूरची निवडणूक जाहीर झालेली आहे.त्याप्रमाणे सिनेट परिवर्तन पॅनल चे अधिकृत एकमेव उमेदवार म्हणून प्रा. प्रशांत भास्करराव डेकाटे सिनेट सदस्य रातुम नागपूर विद्यापीठ नागपूर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. सिनेट परिवर्तन पॅनल ने रातुम विद्यापीठांमध्ये दोन सिनेट सदस्य निवडून आणले होते. मागील सहा वर्षापासून खूप लढलो बेकीने, आता लढूया एकीने या तत्त्वांचा आधार घेऊन यांनी नोंदणी करण्याचे अभियान सुरु केले. प्रस्थापितांची मक्तेदारी संपविण्याकरिता आणि नवीन परिवर्तन घडवून आणण्याकरिता हे सिनेट परिवर्तन पॅनल सातत्याने धडपडत आहे. आज प्रा. प्रशांत भास्करराव डेकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज जिल्हाधिकारी कार्यालयात सादर केला. प्रा. प्रशांत डेकाटे यांच्या पाठीमागे पदवीधरांची बरेच संख्याबळ आहे. प्रा. प्रशांत डेकाटे यांच्या उमेदवारी अर्जामुळे पदवीधरांची उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. सिनेट परिवर्तन पॅनलने नागपूर विद्यापीठात विविध उपक्रम घडवून आणले. ते उपक्रम तरुणांना आवडलेले आहे. आज त्यांचा उमेदवारी अर्ज भरल्या केल्यामुळे हे उमेदवार अत्यंत आनंदाने आणि चुरशीने निवडणुकीच्या तयारी करिता लागलेले आहे सिनेट परिवर्तन पॅनल च्या नावाने काही डमी उमेदवारही उभे असल्याचे आढळून आले परंतु सिनेट परिवर्तन पॅनल ने आपली उमेदवारी प्रा. प्रशांत भास्करराव डेकाटे यांना जाहीर केलेली आहे आणि तसा रीतसर आज निवडणुकीकरिता अर्जही सादर केलेला आहे. परिवर्तन पॅनेल तर्फे सर्व पदवीधरांना विनंती करण्यात आलेली आहे की, कुठल्याही भूलथापांना बळी न पडता परिवर्तन पॅनलचे अधिकृत एकमेव उमेदवार प्रा. प्रशांत भास्करराव डेकाटे यांच्या पाठीशी आपण उभे खंबीरपणे उभे राहावे आणि प्रा. प्रशांत डेकाटे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आव्हान करण्यात आले आहे. सिनेट परिवर्तन पॅनल ला विविध संघटनेने आपले आपला पाठिंबा जाहीर केलेला आहे. त्यांनी आपला उमेदवार न देता प्रा. प्रशांत डेकाटे यांच्या पाठीशी उभे राहण्याची तयारी दर्शवली आहे आज निवडणूक अर्ज सादर करीत असताना विविध संघटनेचे पदाधिकारी आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. त्यामध्ये प्रामुख्याने भारतीय विद्यार्थी मोर्चा चे प्रा. डॉ. नरेश पाटील ह्यूमन राइट्स प्रोटेक्शन फोरम चे आलोक गजभिये, रातुम नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य शीलवंत मेश्राम, डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यार्थी संघटनेचे प्रा. नितीन गायकवाड, प्रा. महेश बन्सोड आणि इतर महत्वाचे सदस्य उपस्थित होते. सामाजिक अंतराचे पालन करून व मास्क चा वापर करून प्रा. प्रशांत डेकाटे यांनी आपला उमेदवारी अर्ज सादर केला. या प्रित्यर्थ प्रा. प्रशांत डेकाटे यांना पूर्ण बहुमताने निवडून आणण्याचे शपथही ग्रहण करण्यात आली.

2 views

Comments


bottom of page