"राजकारणाबाबत उदासीन असण्यापेक्षा राजकारणात प्रवेश करून लढायला शिका, म्हणजेच आपल्या स्वप्नातील विचार निर्माण करता येईल" - अमित झपाटे, पीएचडी (अर्थशास्त्र).
जागतिक राजकारणाचा विचार करता "अमेरिकेची नवीन राष्ट्राध्यक्ष अध्यक्ष जो बाईडन यांचा विजय जवळजवळ निश्चित झालेला आहे तसेच उपराष्ट्रपती म्हणून कमला हॅरीस यांची निवड देखील निश्चित झालेली आहे", परंतु हा विजय सहजासहजी प्राप्त झालेला नाही. "अनेक संकटांना सामोरे जाऊन डेमोक्रॅटिक पक्षाला आपली भूमिका स्पष्ट करावी लागली." अमेरिकेची निवडणूक तशी पाहता अत्यंत किचकट आणि गुंतागुंतीची आहे. कारण त्या ठिकाणी केंद्राकर्षी सरकार आहे परंतु आपल्या भारतामध्ये केंद्रोत्सारी सरकार आहे. "अधिकार आणि जबाबदाऱ्या अमेरिकेमध्ये राज्य सरकार केंद्र सरकारला देते, तर भारतात अधिकार आणी जबाबदाऱ्या केंद्र सरकारकडून राज्य सरकारला मिळते" तसेच संविधानामध्ये केंद्र सूची, राज्य सूची, समवर्ती सूची बनवल्या गेलेल्या आहेत. "अमेरिकेमध्ये मतदान वर्गामध्ये सिनेटरचा फार मोठा वाटा असतो" तेथील विद्यापीठे शक्ती केंद्रे आणि इतर महत्त्वाच्या संस्थाही आपले मतदान देत असते. त्याचबरोबर तेथे लोकांच्या मतांची सुद्धा टक्केवारी काढल्या जाते. आपण विचारही करू शकणार नाही अशा "अंतराळातूनही अमेरिकेत मतदान केल्या गेलेले आहे.कोरोनाचे संकट संपूर्ण देशावर असताना अमेरिकेतील लोक निर्भिडपणे मतदानाचा हक्क बजावत आहे." "त्यामध्ये त्यांच्याकडे ईव्हीएम नसून आजही मतपत्रिकेवर मतदान घेतले जाते" भारताच्या बाबतीत विचार करता भारताचे लोक आजही राजकारणापासून इतके उदासीन आहेत की त्यांना गदागदा हलवून सुद्धा जाग येणे कठीण दिसते. भारतीय संविधानाने दिलेल्या महत्त्वाच्या घटकांमध्ये मताधिकार हा एक महत्त्वाचा भाग आहे याला मी "मतदान न म्हणता मताधिकार हा शब्द वापरला" तो यासाठी , की मतदान करणे हा आपला अधिकार आहे "अमेरिकेतील सुज्ञ लोक आपल्या मतदानाचा अधिकार प्रामाणिकपणे बजावतात परंतु भारतातील लोक मतदानाचा अधिकार सुट्टी, पैसा, दारू, भ्रष्टाचार याचे मायाजाळ स्वीकारतात" "अमेरिकेच्या लोकांनी कट्टरवाचा जसा बिमोड केला तसा बिमोड भारतात केल्या जाईल काय यात शंका आहे" कारण भारतातील भारतातील लोकांना धर्म,जात, वंश,याची गुर्मी चढलेली आहे. म्हणून पारंपारिक पद्धतीने मतदानाचा स्वीकार करून किंवा त्याबद्दल उदासीन असून आपण आपला हक्क व्यर्थ घालवतो. त्यामुळे येथील तरुण सुद्धा राजकारणापासून अलिप्त असताना आढळते. "अनेक गटातटाच्या राजकारणात आपले विचार व्यक्त करणे कठीण आहे परंतु जर तुम्हाला सामोपचाराने आणि एकिकृत संघटना मिळत असेल आणि तरीही तुम्ही त्याबाबत उदासीन असाल तर आपले राजकीय अस्तित्व धोक्यात आहे हे विसरू नये" पदवीधरांचे प्रश्न आज चव्हाट्यावर आहेत. रोजगार नाही किंवा त्यांच्यासाठी लढणारे कोणी नाही हे सर्व असताना "पदवीधरांची निवडणूक तोंडावर असताना आपण त्यात न उतरणे म्हणजेच कट्टर वादाला अनपेक्षितपणे समर्थन देण्यासारखे होईल" त्यामुळे तरुण पदवीधरांना मी आवाहन करतो की आपण मोठ्या प्रमाणात राजकारणात प्रवेश करून "सिनेट परिवर्तन पॅनल" सारख्या एकीकृत संघटनेला पाठिंबा द्यावा आणि या संघटनेने दिलेला एकमेव उमेदवार "प्राध्यापक प्रशांत डेकाटे" यांना विजयी करावे. तसेच "खूप लढलो बेकिने, आता लढूया एकीने" या तत्त्वाचे पालन करून आपण आधुनिक भारताकरिता एक नव्या उमेदीचा नव्या दमाच्या असा उमेदवार निवडून द्यावा. याकरिता प्रत्येक पदवीधरांनी प्रचाराचे अस्त्र उपयोगी आणणे गरजेचे आहे. प्राध्यापक प्रशांत डेकाटे हे नागपूर विद्यापीठातील सिनेट सदस्य असून शिक्षण क्षेत्राचा त्यांना प्रदीर्घ अभ्यास आहेत. अत्यंत व्यासंगी आणि आंबेडकरी विचाराचे समर्थक तसेच पदवीधरांचे विचार मांडणारे व्यक्तिमत्व आपण स्वीकारणे गरजेचे आहे. त्यामुळे "राजकारणाबाबत उदासीन न राहता आपण यात प्रवेश करून प्राध्यापक प्रशांत भास्करराव डेकाटे सिनेट परिवर्तन पॅनल" यांना मोठ्या संख्येने आणि प्रचंड बहुमताने विजय करावे हीच आशा व्यक्त करतो.
"जय भीम"
अमित झपाटे नागपूर. मो. क्र. 09545488942 दि. ०९/११/२०२०
コメント